आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सन १९७२ मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचलनालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९७६ साली आदिवासी विकास आयुक्तालय सुरु करण्यात आले. दि. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. आदिवासी विकास विभागाच्या बळकटीकरणाकरिता सन १९९२ मध्ये आदिवासी विकास संचलनालय हे आदिवासी विकास आयुक्तालयात विलीन करण्यात आले.
आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त व २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून त्यांच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांतर्गत सामाजिक कल्याण, आर्थिक कल्याण...
TollFreeNumber
1800 267 0007
वेळ : 08.00 AM ते 10.00 PM (7 दिवस)
-
तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही
महात्मा गांधी
-
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल
महात्मा गांधी
-
माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो
महात्मा गांधी
-
जीवनात कठोरपणांमुळे आपण बरबाद होऊ शकत नाही, परंतु हे आमचे सहाय्याने सामर्थ्य आणि शक्तींना मदत करण्यास बाहेर पडत आहे, कठोरपणा जाणून घ्या की आपण त्याहून अधिक कठोर आहोत.
डॉ :- ऐ पी जे अब्दुल कलाम
-
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
महात्मा जोतिबा फुले