Assistant

अपर आयुक्त कार्यालय, आदिवासी विकास विभाग, अमरावती

emblem

आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सन १९७२ मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचलनालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९७६ साली आदिवासी विकास आयुक्तालय सुरु करण्यात आले. दि. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. आदिवासी विकास विभागाच्या बळकटीकरणाकरिता सन १९९२ मध्ये आदिवासी विकास संचलनालय हे आदिवासी विकास आयुक्तालयात विलीन करण्यात आले. आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त व २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून त्यांच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांतर्गत सामाजिक कल्याण, आर्थिक कल्याण, शिक्षणामध्ये प्रगती, सामाजिक न्याय, महिला व बाल विकास, आरोग्य, पोषण, रोजगार इ. बाबतच्या योजना राबविण्यात येतात.

अमरावती विभागाचे भौगोलिक क्षेत्र १,०३,१११ चौ.कि.मी. एवढे असून त्यापैकी ९,७०२ चौ.कि.मी क्षेत्र आदिवासी उपयोजनेखाली येते. याचे प्रमाण ९.४० % एवढे होते. याच प्रमाणे २०११ च्या जनगणणेनुसार अमरावती विभागाची लोकसंख्या २,८३,३२,४१३ एवढी असून त्यापैकि १९,३३,७७५ एवढी आदिवासी होती.

अ.क्र.

जिल्हे

एकूण

लोक संख्या

आदिवासी

लोक संख्या

संखेची टक्केवारी (%)

अमरावती

२८८८४४५

४०४१२८

१३.९९

यवतमाळ

२७७२३४८

५१४०५७

१८.५४

अकोला

१८१३९०६

१००२८०

५.५३

बुलढाणा

२५८६२५८

१२४८३७

४.८३

वाशिम

११९७१६०

८०४७१

६.७२

नांदेड

३३६१२९२

२८१६९५

८.३८

हिंगोली

११७७३४५

१११९५४

९.५१

परभणी

१८३६०८६

४०५१४

२.२१

जालना

१९५९०४६

४२२६३

२.१६

१०

औरंगाबाद

३७०१२८२

१४३३६६

३.८७

११

बीड

२५८५०४९

३२७२२

१.२७

१२

लातूर

२४५४१९६

५७४८८

२.३४

एकूण

२८३३२४१३

१९३३७७५

६.८३