Assistant

अपर आयुक्त कार्यालय, आदिवासी विकास विभाग, अमरावती

emblem

अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती

अपर आयुक्त

(संवर्ग पद)

 • आयुक्त, आदिवासी विकास यांनी सह आयुक्तांना प्रदान केलेल्या वित्तीय, प्रशासनिक अधिकारांच्या अनुषंगाने आवश्यक ती कर्तव्ये करणे.
 • आदिवासी उपयोजनेच्या नियोजनविषयक विशिष्ट विकास क्षेत्रानिहाय नेमून दिलेली विवक्षित जबाबदारी पार पाडणे.
 • क्षेत्रीय यंत्रणेतील सर्व वर्ग ३ संवर्गाचे राज्यस्तरीय नियंत्रण ठेवणे, यासाठी सर्व अपर आयुक्तांशी योग्य तो समन्वय साधणे.
 • विंनियोजन लेखे, लेखा परीक्षण आक्षेप यासारख्या महत्वाच्या बाबीचे कामकाज पाहणे, विधिमंडळविषयक बाबींचा समन्वय आणि पूर्तता करणे.
 • आदिवासी उपयोजनेअंतर्गतविविध योजनाच्या अंबलबजावणीच्या संदर्भात शासनाच्या विविध विभंगप्रमुखांशी संपर्क आणि समन्वय ठेवणे.

उप आयुक्त

 • गट अ ते ड या संवर्गातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबी हाताळणे.
 • वर्ग-१ व २ या संवर्गातील अधिकार्‍यांच्या वैयक्तिक नस्त्या व त्यांच्या सेवाकाळाच्या नोंदी घेणे व अद्यावत ठेवणे.
 • मानीव तारीख, दक्षतारोध, सेवाज्येष्ठता इत्यादी विषयक कामकाज
 • सर्व संवर्गातील मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची माहिती वेळोवेळी आढावा घेऊन संकलित करणे.
 • आरक्षणविषयक आढावा घेणे.
 • राज्यस्तरीय विभागीय पदोन्नती समित्यांचे आयोजन करणे.
 • वर्ग- १ ते ३ या संवर्गातील अधिकारी / कर्मचारी याच्या विभागीय परीक्षासंबंधीची सर्व कामे पार पाडणे.
 • वर्ग- १ ते ४ या संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांची प्रशासनविषयक न्यायालयीन, लोकआयुक्त, अपील प्रकरणे व विभागीय चौकशी प्रकरणे
 • वर्ग- २ संवर्गातील अधिकार्‍यांची स्थानांतर विषयक बाबी हाताळणे.
 • प्रशासनविषयक लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद प्रश्न, कपात सूचना, लक्षवेधी सूचना, आश्वासन इत्यादी माहिती मागविणे व पाठविणे.
 • भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्‍यांच्या प्राशनविषयक सर्व बाबी सांभाळणे.
 • गट क व ड संवर्गातील विभागीय स्थानांतर विषयक बाबी हाताळणे.
 • राज्यातील आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करणे.
 • प्रशासनाशी संबंधित असणारी सर्व नियतकालिके, अहवाल प्राप्त करणे, त्यांचे संकलन करून शासनास वेळोवेळी सादर करणे.

सहाय्यक आयुक्त (वित्त)

 • महालेखापाल मुंबई / नागपूर यांच्या लेखापरीक्षण अहवालातील प्रलंबित परिच्छेदाच्या निपटार्‍याबाबत पाठपुरावा करणे व अनुपालन तपासणी व ते सादर करण्यासंबंधीची कार्यवाही करणे.
 • अंतर्गत लेखापरीक्षणातील परिच्छेदांचे अनुपालनाबाबत पाठपुरावा करणे. प्राप्त अनुपालन अहवाल तपासून गंभीर स्वरूपाच्या आक्षेपाबाबत त्वरित कार्यवाही प्रस्तावित करणे.
 • भांडार पडताळणी पथकाने उपस्थित केलेल्या परिच्छेदांच्या निपटार्‍यांची कार्यवाही करणे.
 • राज्यस्तरावरील बैठकीसाठी अत्यावश्यक माहिती संकलित करून सादर करणे.
 • खरेदिविषयक बाबीबाबत वित्तीय सल्ला देणे.
 • मा. अपर आयुक्तांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे विशेष लेखा परीक्षण / चौकशी अशी कामे पूर्ण करणे.
 • विभागातील क्षेत्रीय कार्यालय व संस्थावर वित्तीय दृष्ट्या देखरेख करणे व वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करणे

सहाय्यक आयुक्त (प्रशासन)

 • आयुक्तालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या आस्थापनाविषयक सर्व बाबी, रजा, भविष्य निर्वाह निधि, प्रवास अग्रीमे, रजा प्रवास सवलत, वेतनवाढी, वेतननिश्चिती, कालबध्द पदोन्नती, सेवानिवृत्ती प्रकरणे, सण अग्रिम इत्यादी कामकाज.
 • किरकोळ रजा हिशोब, वैकल्पिक सुट्ट्या, कर्मचारी हजेरीपट, उशिरा येणार्‍या कर्मचारी यांचे हजेरीपट व त्यावर देखरेख, नियंत्रण ठेवणे.
 • टपाल आवक, जावक बाबतची सर्व कामकाज.
 • आदिवासी विकास भवन इमारत, अधिकारी / कर्मचारी वसाहत यांची देखभाल, दुरूस्ती व परिरक्षण इत्यादी कामे व क्षेत्रीय कार्यालयांचे इमारत भाडे, भूसंपादन, इमारत बांधकाम, अधिकारी निवासस्थानचे कामकाजाबाबत कार्यवाही.
 • आयुक्तालयातील वाहने नियंत्रण-इंधन, दुरूस्ती, निगा निर्लेखन इत्यादी करणे. तसेच आयुक्त कार्यालयातील व क्षेत्रीय कार्यालयातील संगणक, फॅक्स, इंटरकॉम, दूरध्वनी, चक्रमुद्रण, टंकलेखन यंत्रे इत्यादी बाबत मंजूरी निगा, देखभाल निर्लेखनविषयक कामकाज.
 • शिष्टाचारविषयक सर्व कामकाज
 • आयुक्तालयाचे भंडार, जडसंग्रह साहित्य व्यवस्थित ठेवणे व त्यासंबंधाने नोंदवही ठेवणे.
 • सर्व कार्यासनातील प्रलंबित संदर्भ, प्रकरणे यांचा पक्षिक, मासीक आढावा या संबंधीची माहिती संकलित करून मा. आयुक्तांना सादर करणे.
 • अपर आयुक्तालयातील सर्व सभांचे आयोजन, सभांचे इतिवृत्त, अल्पोपहार, चहापान व्यवस्था करणे, विश्रामगृह आरक्षण करणे इत्यादी कामकाज.
 • आयुक्तालयातील स्टेशनरी खरेदी, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना गणवेश, सायकली, छत्री पुरवठा करणे.
 • सभागृह व्यवस्थापन करणे, कार्यालयीन स्वच्छता ठेवणे व स्वच्छतागृहे यांची निगा राखणे.
 • क्षेत्रीय कार्यालयाची रचना व कार्यपध्दतिंनुसार निरीक्षणे.
 • सर्व कार्यासनांचा समन्वयव कार्यासनांच्या माहितीचे संकलन करणे.

वरिष्ठ संशोधन अधिकारी (नियोजन)

 • आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील नियोजनविषयक सर्व बाबी जसे वार्षिक, पंचवार्षिक योजनांची आखणी, त्यासाठी नियतव्यय निश्चित करणे, राज्य योजना, जिल्हा योजना, अनुशेषांतर्गत योजना, विशेष कृती कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाखाली क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रस्ताव मागवून ते शासनास सादर करणे.
 • मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीचे शीर्षनिहाय, योजनानिहाय, जिल्हानिहाय, प्रकल्पनीहाय वाटप करणे.
 • नियोजनाशी संबंधित सर्व कामकाज पाहणे.

सहाय्यक आयुक्त (शिक्षण)

 • नवीन आश्रमशाळा प्रस्ताव प्राप्त करणे, प्रस्तावाची छाननी करणे, शिफारस करणे.
 • कार्यरत आश्रमशाळांमध्ये वर्गवाढ, श्रेणीवाढ इत्यादी संबंधी नवीन बाब प्रस्ताव, पुरवणी मागणी इत्यादी तयार करून शासनास सादर करणे.
 • शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह योजनेसंबंधी विधानसभा / विधानपरिषद प्रश्न, लक्षवेधी सूचना, कपात सूचना इत्यादी विषयक कामकाज करणे.
 • आश्रमशाळा संबंधी लोकआयुक्त, न्यायालयीन प्रकरणे इत्यादी कामकाज पाहणे.
 • विद्यार्थी मृत्यू प्रकरण, आश्रमशाळा सांहिता, समिति, लेखा आक्षेप, अनुदानित आश्रमशाळा व्यवस्थापन, तक्रारी,  अनुदानित आश्रमशाळा अनुदान निर्धारण, नियोजन आराखडा, इमारत बांधकाम, भाडे, आदर्श आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा इत्यादी कामकाज पहाणे.

सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शासकीय आश्रमशाळा / वसतिगृह / शिष्यवृत्ती)

 • नवीन आश्रमशाळा प्रस्ताव प्राप्त करणे, प्रस्तावांची छाननी करणे, शिफारस करणे.
 • कार्यरत आश्रमशाळांमध्ये वर्गवाढ, श्रेणीवाढ इत्यादी संबंधी नवीन बाब प्रस्ताव, पुरवणी मागणी इत्यादी तयार करून शासनास सादर करणे.
 • गणवेश, धान्य, वह्या, पुस्तके, औषधे व इतर साहित्य पुरवठ्याबाबत पत्रव्यवहार, अदा करण्यात आलेली देयके व प्रलंबित देयकाबाबतची अद्यावत माहिती ठेवणे.
 • शासकीय आश्रमशाळा / वसतिगृह योजनेसंबंधी विधानसभा / विधानपरिषद तारांकित / अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, कपात सूचना इत्यादिविषयक कामकाज करणे. लोकआयुक्त, न्यायालयीन प्रकरणे, न्यायाधिकरण प्रकरणे इ. कामकाज पाहणे.
 • आश्रमशाळा शालांत, उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल प्राप्त करणे व संकलन करणे, आश्रमशाळा / वसतिगृहातील विद्यार्थी संख्या इ. बाबत अद्यावत माहिती तयार ठेवणे.
 • आश्रमशाळा / वसतिगृहाच्या व्यवस्थापनासंबंधीच्या / कर्मचारी यांच्याबाबतच्या तक्रारी व चौकशीसंबंधी कामकाज करणे.
 • विद्यार्थी मृत्यू प्रकरणे, पुढील शैक्षणिक वर्षाचा नियोजन आराखडा, आश्रमशाळा सुधार समिती व इतर समित्याची स्थापना, बैठक, शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची प्रशिक्षणे / गट संमेलने आयोजन, शासकीय आश्रमशाळा क्रीडाविषयक सर्व बाबी पाहणे. आश्रमशाळा संहिता तयार करणे. लेखा आक्षेपांची पूर्तता करणे.
 • राष्ट्रीय शिक्षक दिन, आदर्श शिक्षक पुरस्कार. आदर्श आश्रमशाळा कामकाज पाहणे.
 • भारत सरकार शिष्यवृत्ती, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, परदेश शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्तीबाबत पत्रव्यवहार व आनुषंगिक कामकाज पाहणे.

सहाय्यक प्रकल्प अधिकारी (अनुदानित आश्रमशाळा)

 • नवीन आश्रमशाळा प्रस्ताव प्राप्त करणे, प्रस्तावांची छाननी करणे, शिफारस करणे.
 • कार्यरत आश्रमशाळांमध्ये वर्गवाढ, श्रेणीवाढ इत्यादिसंबंधी नवीन बाब प्रस्ताव, पुरवणी मागणी इत्यादि तयार करून शासनास सादर करणे.
 • अनुदानित आश्रमशाळा योजनेसंबंधी विधानसभा / विधानपरिषद तारांकित / अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, कपात सूचना इत्यादिविषयक कामकाज करणे. लोकआयुक्त, न्यायालयीन प्रकरणे, न्यायाधिकरण प्रकरणे इ. कामकाज पाहणे.
 • आश्रमशाळा शालांत, उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल प्राप्त करणे व संकलन करणे, आश्रमशाळा विद्यार्थी संख्या इ. बाबत अद्यावत माहिती तयार ठेवणे.
 • आश्रमशाळा व्यवस्थापनसंबंधीच्या / कर्मचारी यांच्याबाबतच्या तक्रारी व चौकशीसंबंधी कामकाज करणे.
 • विद्यार्थी मृत्यू प्रकरणे, पुढील शैक्षणिक वर्षाचा नियोजन आराखडा, आश्रमशाळा सुधार समिति व इतर समित्याची स्थापना, बैठक, आश्रमशाळा संहिता तयार करणे. अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी मंजूरी, नेमणुका व त्यांच्या सेवाविषयक बाबी, लेखा आक्षेपांची पूर्तता करणे.
 • अनुदानित आश्रमशाळा व्यवस्थापणा संबंधी सर्व तक्रारी, पत्रव्यवहार, व त्यांचे निराकरण. त्यांना द्यावयाचे अनुदान व त्याचे निर्धारण करणे. इमारत बांधकाम, भाडे, केंद्रीय आश्रमशाळांचे कामकाज पाहणे.

सहाय्यक लेखा अधिकारी

 • अंतर्गत लेखा परीक्षण, वार्षिक संभाव्य कार्यक्रम आखणी व संभाव्य कार्यक्रमानुसार अपर आयुक्त, प्रकल्प अधिकारी, शासकीय / अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह यांचे लेखा परीक्षण करणे व लेखा परीक्षण अहवाल मा. आयुक्तांना सादर करणे.
 • महालेखाकार यांच्या कार्यालयाने केलेल्या लेखा परीक्षणातील प्रलंबित परिच्छेदांचा निपटारा करणे.
 • भांडार पडताळणी परिच्छेदाचा निपटारा करणे.
 • लेखा परीक्षणात आढळलेल्या वित्तीय / प्रशासकीय अनियमितता संबंधी दोषारोपांसह सविस्तर अहवाल प्रशासन शाखेस देणे.

सहाय्यक लेखा अधिकारी

 • आहरण व संवितरण अधिकारी म्हणून असलेली कर्तव्ये करणे.
 • आयुक्तालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी मासिक वेतन व भत्ते देयके, अग्रिमे देयके, वैद्यकीय प्रतिपूर्ति देयके, भविष्य निर्वाह निधी, अग्रिमांचे देयके तपासणी व कोषागारास सादर करणे.
 • आकस्मिक खर्चाची देयके, तपशीलवार देयके, संक्षिप्त देयके तपासणे व कोषागारास सादर करणे.
 • आयुक्तालयातील व प्रादेशिक कार्यालयातील जमा खर्चाचा ताळमेळाचे कामकाज करणे.
 • लोकलेखा समिती संबंधीच्या पत्रव्यवहार कार्यवाही करणे.
 • विंनियोजन लेखा विषयक कामकाज करणे.
 • आर्थिक बाबीशी निगडीत इतर कार्यासनांकडून आलेल्या नस्तीवर अभिप्राय, सल्ला, मार्गदर्शन देणे व आर्थिक व्यवहाराशी संबंधित सर्व कामकाज पाहणे.